मुले परीक्षेत नापास का होतात ?
एका वर्षामध्ये फक्त ३६५ दिवस असल्यामूळे शक्यतो मुले परीक्षेत नापास होतात.
आता बघुया एखाद्या मुलाचे शैक्षणिक वर्ष कसे जाते.
तुम्हाला माहित आहे तरीही लक्षात ठेवा की एका वर्षामध्ये ३६५ दिवस असतात.
एका वर्षामध्ये ५२ रविवार असतात. आता रविवारी अभ्यास करणार की खेळणार. मग ३६५ मधून ५२ वजा केले की राहिलेत ३१३ दिवस.
उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, नाताळची सुट्टी अशा ५० सुट्ट्या वजा केल्यास राहिलेत २६३ दिवस.
दररोज आपण ८ तास झोपतो. म्हणजे वर्षाला १३० दिवस झोपतो. आता हे दिवस वजा केल्यास राहिलेत १४१ दिवस.
मुले रोज १ तास खेळतात. खेळल्याने मुलांची तब्येत सुधारते. अशा प्रकारे रोज १ तास म्हणजे वर्षाला १५ दिवस खेळतात. आता हे दिवस वजा केल्यास राहिलेत १२६ दिवस.
दररोज २ तास दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि न्याहरी करण्यात जातात. म्हणजेच
वर्षाला एकुण ३० दिवस लागतात. आता हे दिवस वजा केल्यास राहिलेत ९६ दिवस.
दररोज १ तास बोलण्यात आणि इथे तिथे जाण्यात जातो. म्हणजे वर्षाला १५ दिवस
लागतात. हे दिवस वजा केल्यास राहिलेत ८१ दिवस.
वर्षातील ३५ दिवस शाळेमध्ये परीक्षा असतात. आता परीक्षेच्या दिवशी अभ्यास करणार का पेपर सोडविणार हे दिवस वजा केल्यास राहिले ४६ दिवस.
वर्षातील ४० दिवस निरनिराळे सण,गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, इतर लहान-मोठे सण यांच्यामध्ये जातात. आता हे ४० दिवस वजा केल्यास राहिलेत ६ दिवस.
वर्षातील ३ दिवस तरी निदान आजारपण, ताप, सर्दी तांच्यामध्ये जातात. आता राहिलेत ३ दिवस.
वर्षातील २ दिवस ( फक्त ) चित्रपट, टिव्हीवरील कार्यक्रम बघण्यात जातात.
आता उरला १ दिवस.
आणि त्या दिवशी त्या मुलाचा वाढदिवस असतो आणि या दिवशी तरी कोणी अभ्यास करतो का?
मग उरले 0 दिवस.
आता सांगा मुले अभ्यास करणार कधी आणि परीक्षेमध्ये पास होणार कधी.
0 comments:
Post a Comment