एक होता चिमणा व एक
होती चिमणी..
दोघात खूप
प्रेम होते..
एके
दिवशी चिमणी चिमण्याला म्हणाली.. तू
... मला सोडून,,उडून तर जाणार नाहीस
ना?...
...
तेंव्हा चिमणा म्हणाला मी जर उडून
गेलो तर तू मला पकडून घेशील...
चिमणी म्हणाली मी तुला त्यावेळी पकडू
तर
शकेल पण तुला मिळवू
नाही शकणार.. हे
ऐकुन चिमण्याचे डोळे भरून आले..
त्याने आपले पंख छाटून
टाकले..
आणि चिमणीला म्हणाला आता तर
ठीक आहे ना...?
आता आपण नेहमी सोबत राहू... ...... एके
दिवशी जोराचे वादळ
सुटले..
चिमण्याला पंख नसल्याने तो उडू
शकत
नव्हता.. चिमणी मात्र....
तो चिमणीला म्हणाला तू उडून जा..
चिमणीने
त्याला स्वताची काळजी घे असे
सांगून उडून गेली..
थोड्या वेळाने वादळ शमले... चिमणी परत आली..
पाहते तर चिमणा मरून
पडला होता..
बाजूच्या फांदीवर लिहिले होते..
प्रिये..
फक्त एकदा ..एकदाच जर तू मला म्हटले असते
कि मी तुला सोडून नाही जाऊ
शकत..
तर
कदाचित हे वादळहि माझे
काही बिघडवू शकले नसते... प्रेम हे असेच असते...
"जपुन टाक पाऊल...
इथे प्रत्येक वाट आपली नसते जपुन ठेव विश्वास...
इथे प्रत्येक माणुस आपला नसतो जपुन घे निर्णय...
इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो जपुन ठेव आठवण...
इथे प्रत्येक क्षण सारखा नसतो जपता जपता एक कर..
जपुन ठेव मन कारण...
"तेच फक्त'आपलं'असतं"...
0 comments:
Post a Comment