एक तरुण शेतकऱ्याच्या मुलीशी लग्न
करू इच्छितो.
ती मुलगी आसपासच्या सर्व प्रदेशांतील
मुलींपेक्षा अतिशय सुंदर असते.
लग्नाची मागणी घालण्यासाठी तो शेतकऱ्याच्या घरी पोहोचतो.
शेतकरी त्याला नीट निरखून
पाहतो आणि लग्नाची अट सांगतो-
‘बेटा त्या मैदानात जाऊन उभा राहा, मी येथून
एकामागून एक
तीन बैल सोडेन
त्यापैकी कोणत्याही एका बैलाची शेपटी पकडण्यात
तू यशस्वी राहिलास तर
मी माझ्या मुलीचा तुझ्याशी विवाह
करेन.’
तो तरुण मैदानात जाऊन
उभा राहिला आणि बैलाची प्रतीक्षा करू लागला.
काही वेळाने गेटचा दरवाजा उघडण्यात
येऊन त्यातून एक तगडा मस्तवाल
बैल उड्या मारत बाहेर पडला.
यावेळी तरुण
विचार करतो की, या मस्तवाल
बैलाला पकडण्याऐवजी पुढील
बैलाला पकडणे योग्य राहील. त्यामुळे
तो एका कोपऱ्यात जाऊन लपून बसला.
पहिला बैल असाच निघून गेला.
नंतर पुन्हा एकदा गेटच्या दरवाजातून
एक महाकाय, रागीट बैल बाहेर येताना तरुणाने
पाहिला.
मात्र त्या तरुणाने आतापर्यंत जीवनात
असला बैल कधीच पाहिलेला नसतो.
तो बैल नाकपुड्या फुगवत
रागात त्या तरुणाकडे पाहत होता व
त्याच्या तोंडातून लाळदेखील टपकत होती.
तरुण कमालीचा घाबरून जातो व विचार करतो की,
या रागीट
बैलाला पकडण्याऐवजी पुढचा बैल
कसाही आला तरी त्याला कुठल्याही परिस्थितीत
पकडायचे. त्यामुळे तो पुन्हा एकदा लपून बसतो.
तिसरा बैल सोडण्यासाठी दरवाजा उघडला तोच
तरुणाच्या चेहऱ्यावर
हसू उमटले, कारण तो बैल अतिशय अशक्त
आणि साधा होता.
तरुण त्याला पकडण्यासाठी तयार
होतो आणि तो बैल जवळ
आल्या बरोबर त्याला तत्काळ पकडतो, परंतु .....
.
.
.
त्या बैलाला शेपूटच नव्हते.....
तात्पर्य ?
- जीवनात मिळालेली पहिली संधी कधीही सोडू
नये. कारण संधी कधीच कुणासाठी थांबून राहत नाही.
एखादी गोष्ट साध्य
करण्यासाठी केवळ विचार न
करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात
करायला हवी. तर आणि तर तुम्हांला यशाचा आनंद येईल
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment